Advertisement

राष्ट्रीय कुंग फू स्पर्धेत तनिष्क करंजेला सुवर्णपदक


राष्ट्रीय कुंग फू स्पर्धेत तनिष्क करंजेला सुवर्णपदक
SHARES

प्रतिक्षानगर येथील तनिष्क करंजे या विद्यार्थ्याने कुंग फूच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्याच सहभागात सुवर्णपदकावर स्वतःचं नाव कोरले आहे. गेल्या वर्षी NHAF च्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्येही तनिष्क त्याच्या गटात भारतामध्ये पहिला आला होता. या स्पर्धेत दोन प्रकारे स्पर्धकांचं मुल्यांकन केलं गेलं. एक म्हणजे परिक्षकांच्या पसंतीचं बक्षिस. दुसरं म्हणजे फेसबुक लाइक्स. परिक्षकांनी तनिष्कच्या चित्राला पहिलं बक्षिस घोषित केलं तर देशभरातील लोकांनी त्याच्या चित्राला दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे तिथेही तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत ही दोन्ही बक्षिसं मिळवणारा तो आजवरचा एकमेव चित्रकार ठरला.

तनिष्क चांगला चित्रकार तर आहेच. मात्र, तो एक चांगला खेळाडूही आहे. चित्रकला किंवा कुंग फूच नाहीतर कुठल्याही स्पर्धेत तो जिंकण्याच्या जिद्दीनेच उतरतो. तनिष्कच्या स्वभावाचा आणखी एक पैलू म्हणजे तो पक्का हजरजबाबी आहे. त्याच्याकडे मराठी शब्दांचं भंडारच आहे. याशिवाय खेळ, सिनेमा, नाटक, सामाजिक घडामोडी, राजकीय, आंतरराष्ट्रीय गोष्टींचीही त्याला चांगली माहिती आहे, असं त्याचे वडील निलेश करंजे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा