मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियाची धमाकेदार कामगिरी

 Pali Hill
मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियाची धमाकेदार कामगिरी

मुंबई - स्टॅन्डर्ड चार्टर्ड या 14 व्या मॅरेथॉन स्पर्धेत टांझानियाच्या अल्फोन्से सिंबू याने प्रथम क्रमांक पटकावलाय. रविवारी सकाळी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये केनियानेही प्रभावी कामगिरी केली. या स्पर्धेत जोश्वा किपकोरीर याने दुसरा क्रमांक पटकावला. तर केनियाच्या बोर्न्ड कितूर हीने महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

सिंबूने 2 तास 9 मिनीट 32 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली, तर किपकोरीरने 2 तास 9 मिनीटे आणि 50 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केला. यामध्ये इलुईड याने केनियाच्या बारगेट्युनीन 2 तास 10 मिनीट 39 सेकंदात धाव पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला. या मॅरेथॉनमध्ये जॅकोब चेसरी याने 2 तास 11 मिनीट 36 सेकंदात धाव पूर्ण करत चौथा क्रमांक पटकावला. तर बोनसा डिडाने 2 तास 11 मिनीट 55 सेकंदात धाव पूर्ण केली आणि पाचवा क्रमांक पटकावला.

Loading Comments