कसोटी क्रिकेटला झाली 140 वर्ष

 Mumbai
कसोटी क्रिकेटला झाली 140 वर्ष

मुंबई - कसोटी क्रिकेटला 140 वर्ष झाल्याच्या निमित्ताने गूगलने खास डूडल तयार केले आहे. कसोटी सामन्याच्या 140 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे डूडल करण्यात आले आहे. 1877 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचा पहिला सामना खेळवण्यात आला होता. त्याला आज 140 वर्ष पूर्ण झालेत. त्यावेळी म्हणजेच 1877 साली मेलबर्न स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला होता. आजच्या या डूडलमध्ये गोलंदाज, फलंदाज तसेच इतर असे खेळाडू चेंडू पकडताना दिसत आहेत.

Loading Comments