ठाणे टेबलटेनिस लीगमध्ये अव्वल खेळाडूंचा सहभाग


SHARE

ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनच्या सहकार्याने जिंदाल स्पोर्टस अकादमीच्या वाशिंद (ठाणे) येथील अकादमीत तिसऱ्या जेएसडब्ल्यू-ठाणे जिल्हा टेबलटेनिस अांतरक्लब लीग स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. या स्पर्धेत राज्यातील अव्वल मानांकित खेळाडू एकमेकांशी लढणार अाहेत.


३०० खेळाडूंचा सहभाग

या स्पर्धेत ३० पेक्षा जास्त टीम्सनी तसेच ३०० पेक्षा जास्त टेबलटेनिसपटूंनी अापला सहभाग नोंदवला असून राज्यात अग्रस्थानी असलेले जश दळवी अाणि युगंध झेंडे हेसुद्धा या स्पर्धेत अापला जलवा दाखवणार अाहेत.


टेटेच्या प्रसारासाठी सर्वकाही

ठाणे जिल्हा अाणि अासपासच्या परिसरातील टेबलटेनिस खेळाला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. या स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार अाहेत. दुसऱ्यांदा जिंदाल स्पोर्टस अकादमीने या स्पर्धेचे शिवधनुष्य हाती पेलले अाहे.


हेही वाचा -

केदार जाधवला वेध पुनरागमनाचे!

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!संबंधित विषय
ताज्या बातम्या