यूएस क्लबने पुन्हा मारली बाजी

  Chembur
  यूएस क्लबने पुन्हा मारली बाजी
  मुंबई  -  

  चेंबूर - युनायटेड सर्व्हिस क्लबने 21 व्या ग्रोवर विनयार्ड इंटर क्लब या चॅम्पियनशिपमध्ये बाजी मारत आपण पश्चिम भारतातले सर्वात चांगले गोल्फ खेळाडू असल्याचं सिद्ध केलंय.

  रविवारी झालेल्या या स्पर्धेत विलिंगडन स्पोर्ट्स क्लबचा परावभव करत युनायटेड सर्व्हिस क्लबने पुन्हा एकदा बीपीजीसी हा खिताब मिळवला. यासह 22.5 गुणही कमावले. तर विलिंगडन स्पोर्ट्स क्लबने साडेचौदा गुण मिळवले.

  यू एस क्लबमध्ये नुकतीच संधी मिळालेला खेळाडू केशव मिश्राने डब्लूसीएतल्या अर्जुन गुप्ताविरोधात पहिल्या फेरीत विजय मिळवला. युनाइटेड सर्व्हिस क्लबमधील सर्व खेळाडूंच्या चांगल्या कामगीरीमुळेच हा खिताब मिळवण्यात यश आलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.