• राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत उत्कर्ष क्रीडा मंडळाची बाजी
SHARE

काळजाचा ठेका चुकविणाऱ्या अंतिम सामन्यात बबलू गिरीच्या सातत्यपूर्ण अाणि भेदक चढायांमुळे पुण्याच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाचा ३४-३३ असा निसटता पराभव करत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने अायोजित राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. मध्यंतराला १३-१२ अशी अाघाडी घेत उत्कर्षने एका गुणाच्याच फरकाने मात करत २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्राॅफ अाणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात अाले.


प्रभादेवीवासीयांना थरारक सामन्याची पर्वणी

अंतिम सामना रंगतदार ठरणार, ही प्रभादेवीवासीयांची अाशा खरी ठरली. बबलू गिरीने एकाच चढाईत दोघांना बाद केले, त्यानंतर अोंकार कुंभारने तोडीस तोड उत्तर देत युद्धाला तोंड फोडले. रत्नागिरी संघ अाघाडी घेण्याच्या पवित्र्यात असताना अभिजित चौधरीने एकाच चढाईत तीन मोहरे टिपत पुण्याला अाघाडीवर अाणले. त्यानंतर प्रेक्षकांनीही अारडाअोरड करत वातावरणात अाणखीनच रंग भरला.


शुभम शिंदेला संमिश्र यश

रत्नागिरीच्या शुभम शिंदेने अखेरच्या क्षणी अाक्रमणाला का सुरुवात केली, याचे कोडे कुणालाच समजले नाही. त्याला संमिश्र यश मिळाले तरी त्याला दोन वेळा ‘सुपर कॅच’ करण्यात अाले. पुण्याचा कोपरारक्षक चेतन पारधेने मोक्याच्या वेळी सात पकडी केल्या, त्या पुण्याच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या.शुभम शिंदेला मिळाली बाईक

कोपरारक्षक चेतन पारधेला सर्वोत्तम पकडीचे पारितोषिक देण्यात अाले. वाघजाईच्या अजिंक्य पवार याने उत्तम चढाईपटूचे बक्षिस मिळवले. स्पर्धेतील मानाचे म्हणजेच सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक शुभम शिंदे या ज्युनियर अांतरराष्ट्रीय कबड्डीपटूने पटकावले. बाईक देऊन त्याचा सत्कार करण्यात अाला.


संबंधित विषय
ताज्या बातम्या