वैशाली सलवाकरची चांगली सुरुवात

Mumbai
वैशाली सलवाकरची चांगली सुरुवात
वैशाली सलवाकरची चांगली सुरुवात
See all
मुंबई  -  

मुंबई - आयबीसीए चेस चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या वैशाली सलवाकर हिने चांगली सुरुवात करत बांगलादेशच्या बप्पी सरकारला जोरदार टक्कर दिली आहे. बप्पी सरकारसारख्या तगड्या खेळाडूला आव्हान देत तिने सामना बरोबरीत सोडवला. 

बप्पी सरकारची रँकिंग 1809 तर वैशालीची 1431 आहे. 38 व्या चालीत वैशाली आणि बप्पीने प्रत्येकी अर्धे अर्धे गुण मिळवले. दरम्यान याच चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या सप्नील शाह याचा सामना नेपाळच्या आर्थर लेटीमसोबत होणार आहे. विशेष म्हणजे स्वप्नील हा बुद्धीबळाचा प्रशिक्षक देखील आहे. तसेच तो एमएमआरडीएमध्ये नोकरी करतो. तर वैशाली ही गृहिणी असून, ती दृष्टिहीन मुलांना प्रशिक्षण देते. तर दुसरीकडे ठाण्याच्या शिरीष पाटील याने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या हरियमुमुल्ला विथागांव याचा पराभव केला. दृष्टीहिनांसाठी आयबीसीए चेस चॅम्पियनशिप मणिपाल विश्वविद्यालय येथील उडुपी परिसरात 22 ते 31 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.