Advertisement

विग्नेश खोपडेची आक्रमक खेळी, सुवर्णपदकावर कब्जा


विग्नेश खोपडेची आक्रमक खेळी, सुवर्णपदकावर कब्जा
SHARES

वीर सावरकर अकॅडमीच्या विग्नेश खोपडेनं आक्रमक खेळाच्या जोरावर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या रुपीन हुडेवर मात करत अंतिम सामन्यात ६९-७५ वजनी गटात विजय मिळवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. या रोमांचक लढतीत रुपीन हूडाने देखील प्रतिस्पर्धी विग्नेशला झोपवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश मिळवता आले नाही. उत्तर मुंबई क्रीडा महोत्सवतर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा कांदिवलीतल्या युवक क्रीडा मंडळ येथे खेळवण्यात आली.


मुलींच्या गटात कोण विजयी

इतर सामन्यांत मुलींच्या गटात दहिसर अकॅडमीच्या त्रिथा देवोलकर आणि श्रेया सावंत या दोघींनी अनुक्रमे क्लब क्लासिक ४२-४४ आणि ४०-४२ वजनी गटात शानदार कामगिरीच्या जोरावर मोस्ट प्रॉमिसिंग पुरस्कारावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत मालवणीच्या सेंट मॅथ्यू याने एकूण ७५ गुणांसह ओव्हरऑल चॅम्पियनशीपचा मान मिळवला, तर दादरच्या केडीस बॉक्सिंग अकॅडमीला ५८ गुणांसह उपविजेतेपदावर सामाधानी मानावे लागले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा