शनिवारी भारत विरुद्ध चीन जुंपणार

Worli
शनिवारी भारत विरुद्ध चीन जुंपणार
शनिवारी भारत विरुद्ध चीन जुंपणार
शनिवारी भारत विरुद्ध चीन जुंपणार
See all
मुंबई  -  

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून सीमारेषेवर चांगलाच वाद सुरू आहे. या दोन्ही देशांतल्या युद्धाची चर्चा सुरू असताना आता 5 ऑगस्ट रोजी या दोन्ही देशांचे खेळाडू आमने सामने येणार आहेत. भारतात पहिल्यांदाच बॅटलग्राऊंड एशिया या बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत हे खेळाडू एकमेकांशी भिडतील.

ही स्पर्धा 'डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट' आणि 'डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट' खिताब यासाठी होणार आहे. बॅटलग्राऊंड एशिया ही आशियातील सर्वात मोठी बॉक्सिंग स्पर्धा आहे. भारताचा प्रसिद्ध ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग विरुद्ध चीनचा बॉक्सिंग सुपरस्टार झुलपिकर मैमैतीआली यांच्यातील लढत शनिवारी वरळी येथील एनएससीआय स्टेडियमवर होणार आहे. ही लढत बघण्यासाठी बॉक्सिंगप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे.विजेंदरने चीनच्या झुलपिकरवर टीका केली होती. 'चायनीज माल जास्त टिकत नाही' असं म्हणत त्याची खिल्ली उडवली होती.

मी विजेंदरसोबत दोन हात करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मला माझ्या बॉडी आणि टेक्निकवर विश्वास आहे. मानसिकरित्या मी पूर्णपणे मजबूत आहे. पहिल्यांदा भारतात फाईट करत आहे. याबद्दल मला काही विशेष वाटत नाही. मी इथे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आलो आहे. तुम्ही कोणत्या देशात येऊन फाइट करताय हे महत्त्वाचे नाही, मला रिंगमध्ये शंभर टक्के कामगिरी करून विजय मिळवायचा आहे.

झुलपिकर मैमैतीआली, चीनी बॉक्सिंगपटूमाझ्या आयुष्यात आतापर्यंत कधीच मुंबईत फाईट झाली नाही. यंदा पहिल्यांदाच मी मुंबईत फाईट करणार आहे. महाराष्ट्रात अनेकदा फाईट खेळलो आहे. जेव्हा मी ऑलिंपिकमध्ये कास्यंपदक मिळवले होते, तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो. मुंबईकरांचे खेळावर खुप प्रेम आहे. भारत आणि चीनच्या सीमारेषेवर जरी वाद चालू असले, तरी बॉक्सिंगच्या रिंगणात ते नसणार. प्रत्येक खेळ हा लोकांना जोडत असतो.

विजेंदर सिंग, भारतीय मुष्टियोद्धा

झुलपिकर सध्या जुहू येथील एका हॉटेलमध्ये थांबला असून या लढतीसाठी तो पूर्वतयारी करत आहे. यावेळी झुलपिकरचे प्रशिक्षक यांनीही पत्रकारांशी सवांद साधला. 'मला माहीत नाही विजेंदर झुलपिकरबद्दल काय विचार करतो. पण त्याला उत्तर येत्या शनिवारी होणाऱ्या फाइटमध्येच मिळेल', असे झुलपिकरचे प्रशिक्षक होवेल यांनी विजेंदरच्या चॅलेंजला उत्तर दिले.

विजेंदर हा सध्या वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायजेशन (डब्ल्यूबीओ) एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेता आहे. झुलपिकर हा देखील डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे. पण आता जो कोणी ही लढत जिंकेल त्यालाच डब्ल्यूबीओचा खिताब मिळेल.विजेंदर सिंगझुलपिकर मैमैतीआली
बाऊट्स89
विजय88
अनिर्णित01
पराभव00
नॉक आऊट76
राऊंड्स3027


तुम्हाला हा सामना सोनी टेन 1, सोनी टेन 1 एचडी, सोनी टेन 3 आणि सोनी टेन एचडी या स्पोर्ट्स चॅनलवर शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता पाहता येईल.  
हेही वाचा -

विजेंदर सिंग मुंबईत लढणार!


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.