Advertisement

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विकास धारियाची बाजी


राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विकास धारियाची बाजी
SHARES

बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या हॉलमध्ये रंगलेल्या पाचव्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या विकास धारियाने विजेतेपदाला गवसणी घातली. विकास धारियाने फॉर्मात असलेल्या मुंबईच्याच पंकज पवारचा २०-२५, २५-१५, १९-१० असा पराभ‌व करून विजेतेपद पटकावले. विकास धारियाचे हे राज्य मानांकन स्पर्धेतील पहिलेवहिले विजेतेपद ठरले. अतिशय फॉर्मात असलेल्या पंकज पवारने पहिला सेट जिंकून विजयाच्या दिशेने कूच केली. मात्र, विकास धारियाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत पुढील दोन्ही गेम जिंकून बाजी मारली.


महिलांमध्ये काजल कुमारी विजयी

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत काजल कुमारीने निर्विवाद वर्चस्व गाजवत जेतेपद पटकावले. काजल कुमारीने मुंबईच्या आयेशा मोहम्मदला डोके वर काढू दिले नाही. अंतिम लढतीत तिने काजलचा २४-१२, २५-१७ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत काजलने ठाण्याच्या मीनल लेले-खरे हिला २५-७, २५-० असे पराभूत केले होते. तर आयेशाने मुंबईच्या संगीता चांदोरकर हिला १-२५, २५-९, १५-१३ अशी धूळ चारली होती. विजेत्यांना एमसीएफचे उपाध्यक्ष डॉ. व्योमेश शहा आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा