रिओ मेडलसाठी आम्ही सज्ज - गोपिचंद

 Mumbai
रिओ मेडलसाठी आम्ही सज्ज - गोपिचंद
Mumbai  -  

मुंबई - रिओ मेडलसाठी आम्ही सज्ज असल्याचे भारताचे बॅटमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी सांगितले. अर्जून पुरस्कार विजेते पी.गोपिचंद यांनी बुधवारी मुंबईमध्ये मायक्रोसॉफ्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव आणि महत्त्वाच्या क्षणांना उजाळा दिला. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला नक्की त्यात यश मिळेल असं त्यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो की मला चांगले विद्यार्थी मिळाले. तसेच तुमचे अपयश हे तुम्हाला यशापर्यंत पोहोचवू शकत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्याचसोबत पी.व्ही.सिंधुनेही खुप मेहनत घेतली त्यामुळे तिला ऑलंम्पिकमध्ये पदक मिळाल्याचं त्यांनी सांगितले.

Loading Comments