अंपायरच्या कामाची कदर नाही झाली - गोठोसकर

    मुंबई  -  

    मुंबई - आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट अंपायर म्हणून झळकणारे एक मराठी नाव म्हणजे माधव गोठोसकर. भारतात क्रिकेटला लहानाचे मोठे होताना माधव गोठोसकर यांनी पाहिले आहे. वयाच्या 89 वर्षी ही त्यांच्यातील जोश तरुणांनाही लाजवेल. पंचांचे बदलेले काम, नियम यासंदर्भात गोठोसकर यांनी मुंबई लाइव्हशी बातचित केलीय. या वेळी कालांतराने क्रिकेट या खेळात खूप बदल झाला आहे, अशी भावना गोठोसकरांनी व्यक्त केली. पंचाला प्रत्येक सेकंदाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. तरीही अनेक वर्ष झाली अंपायरच्या कामाची कधी कदर केली गेली नाही, अशी खंत गोठोसकर यांनी व्यक्त केली. तसेच पंचांचे बदलेले नियम यावरही त्यांनी आक्षेप घेतला. आमच्या वेळी पंचांबद्दल आदर होता. स्थानिक पातळींवर आयोजित करण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये होणाऱ्या बाचाबाचीवर गोठोसकर यांनी नाराजी व्यक्त केली. पंचांचा धाक उरला नसल्याने अशा घटना घडत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.