मुंबईत पहिल्यांदाच विफा युथ चॅम्पियनशिप

 Colaba
मुंबईत पहिल्यांदाच विफा युथ चॅम्पियनशिप
Colaba, Mumbai  -  

विफा युथ चॅम्पियनशिपला गुरुवारी 21 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. 21 एप्रिल ते 1 मे 2017 पर्यंत खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 क्लबनी सहभाग घेतला आहे. विफा स्टेट युथ चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक आणि सोलापूरच्या संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा मुंबईमध्ये पहिल्यांदाच होत असून, मुंबईच्या कुपरेज मैदानात सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे 4 गटांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.

स्पर्धेचे गट पुढील प्रमाणे

अ गट - खांदोबा तालीम मंडळ-कोल्हापूर, अखिल भारतीय फुटबॉल अकादमी-पुणे, रब्बामी एफसी-नागपूर, गोवा एफसी-मुंबई

ब गट - मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन, जे. जे. अकादमी-मुंबई, मॅथ्यू फुटबॉल अकादमी-पुणे, डेक्कन एफसी-पुणे

क गट - सेंट जॉन्स क्लब-नागपूर, नाशिक फुटबॉल कोचिंग सेंटर-नाशिक, मुंबई एफसी, हॉटेल मंत्रालय एफसी-सोलापूर

ड गट - केशव माधव प्रतिष्ठान-पुणे, मॅजिक मेड एफसी-सोलापूर, पताकदील तालिम मंडळ-कोल्हापूर, सेंट झेविअर्स एफसी-नाशिक

Loading Comments