अजिंक्य रहाणेकडे 'विराट' नेतृत्व

  Mumbai
  अजिंक्य रहाणेकडे 'विराट' नेतृत्व
  मुंबई  -  

  मुंबई - दुखापतीमुळे चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरला नसल्यामुळे शनिवारी धर्मशाळा येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे.
  विराट कोहलीला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही, पण संघव्यवस्थापकांनी मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला धर्मशाळा येथे पाचारण केले आहे. यापूर्वीच भारतीय संघासोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही धर्मशाळा येथे पोहोचला आहे. चौथ्या कसोटीत दुखापतीमुळे विराट कोहली संघाबाहेर बसला तर मुंबईकर अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. चौथ्या कसोटीत रहाणेने कर्णधारपद सांभाळल्यास सचिननंतरचा पहिलाच मुंबईकर तो कर्णधार असेल. चार कसोटी सामन्याची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून, धर्मशाळा येथील कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील. विराट कोहली संघाबाहेर गेल्यास भारताची फलंदाजी कुमकुवत होऊ शकते. तर अजिंक्य कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करणार हे अभिमानास्पद असल्याची भावना एमसीए उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी व्यक्त केली. तसेच अजिंक्य हा मेंटली खूप स्ट्राँग आहे आणि तो नक्कीच चांगल्या प्रकारे टीम लीड करेल. अंडर 14 टीममध्ये अंजिक्य खेळत असल्यापासून आपण त्याला पाहतोय, 2000 साली राजस्थानमध्ये झालेल्या डेब्यू मॅचमध्ये त्याने उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यावेळी त्या टीमचे आपण मॅनेजर असल्याचंही देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नक्कीच अजिंक्य यशस्वीपणे नेतृत्व करेल असे एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.