Advertisement

मस्तान वायएमसीए बास्केटबाॅल स्पर्धेत ख्राईस्टचर्चचा थरारक विजय


मस्तान वायएमसीए बास्केटबाॅल स्पर्धेत ख्राईस्टचर्चचा थरारक विजय
SHARES

ख्राईस्टचर्चच्या युवा बास्केटबाॅलपटूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत यजमान मस्तान वायएमसीएचा पाडाव करत प्रतिष्ठेच्या मस्तान वायएमसीए बास्केटबाॅल स्पर्धेत विजयाचे खाते खोलले. अाग्रीपाडा येथील मस्तान वायएमसीएच्या कोर्टवर सुरू असलेल्या सलामीच्या सामन्यात दोघांनीही तोडीस तोड खेळ केला. निर्धारित वेळेत २४-२४ अशी बरोबरी असताना ख्राइस्टचर्चने अाक्रमक खेळ करीत गुण वसूल केले अाणि ३४-२८ अशा फरकाने विजय मिळवला.


वेलिंग्टन वायएमसीएची ठाणे पोलिसांवर मात

पहिल्या दिवशी झालेल्या अन्य दोन सामन्यांमध्ये एकतर्फी निकाल लागले. वेलिंग्टन वायएमसीए संघाने ठाणे पोलिसांचा ३६-१० असा धुव्वा उडवला तर इंटरनॅशनल वायएमसीए हाऊने यजमानांच्या ड संघाचा ३४-३ असा पाडाव केला. झयान ढोलूने १० गुण मिळवत इंटरनॅशनल वायएमसीए हाऊसला मोठ्या फरकानं विजय मिळवून दिला.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा