Advertisement

Facebook चं नवं फिचर, आर्टिकल शेअर करण्यापूर्वी वाचावं लागणार

नव्या फिचर्सननुसार, युजरला एखादा लेख फेसबुक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यापूर्वी एकदा वाचावा लागणार आहे.

Facebook चं नवं फिचर, आर्टिकल शेअर करण्यापूर्वी वाचावं लागणार
SHARES

सोशल मिडीया जायंट फेसबुक लवकरच एक नवं प्रॉम्प्ट (Prompt) लॉन्च (Launch) करत आहे. या प्रॉम्प्टमुळे युजरला एखादा लेख फेसबुक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यापूर्वी एकदा वाचावा लागणार आहे.

जास्त प्रमाणात शेअर झालेल्या बातम्या, लेख अधिकाधिक युजर्सपर्यंत पोहोचावेत यासाठी कंपनीकडूम पॉप अप्स (POP-UPS) देण्यात येणार असल्याचं फेसबुकनं सांगितलं.

फेसबुकच्या नवीन प्रॉम्प्टची अँड्रॉईड स्मार्टफोनसह (Android Phones) सिस्टीमसाठी तपासणी केली जात आहे. हा प्रॉम्प्ट लगेच सर्व युजरसाठी उपलब्ध नसेल. परंतु, तो लवकरच लॉन्च केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

जर एखाद्या युजरनं बातम्यांची लिंक ओपन न करताच शेअर करण्याचा प्रयत्न केला, तर फेसबुक तातडीनं ती लिंक इतरांसोबत शेअर करण्यापूर्वी ओपन करून वाचण्यासाठी सांगेल. हा प्लॅटफॉर्म माहिती, योग्य चर्चेला चालना देण्यासाठी मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या रिड आर्टिकल फर्स्ट (Read Article First) या सारखाच आहे.

कोरोना महामारी (Corona Pandemic) कालावधीत चुकीच्या माहितीचा प्रसार आणि बनावट बातम्यांमुळे फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मच्या अनुषंगानं निर्माण होणारे गैरप्रकार रोखणं हे या नव्या फीचरचं उद्दिष्ट आहे.

कंपनीनं शेअर केलेल्या माहितीनुसार, न वाचता लेख किंवा आर्टिकल शेअर केल्यास युजर महत्वाच्या गोष्टी गमावू शकतात. या फीचरमुळे लेख न वाचता युजर पुढे पाठवू इच्छित असेल किंवा लेख वाचायचा असेल, तर त्यास 'Continue Sharing' किंवा 'Open Article' असे ऑप्शन्स मिळू शकतात.

रिड फर्स्ट आर्टीकल या प्रॉम्प्टमुळे किती फरक पडला याबाबत ट्विटरनं (Twitter) अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. याबाबत कंपनीनं म्हटलं आहे, की आक्षेपार्ह ट्विटचा संकेत मिळताच या प्रॉम्प्टमुळे सुमारे ३४ टक्के लोकांना त्यांचा प्रारंभिक रिप्लाय सुधारण्यास सांगितलं गेलं. तसंच त्यांनी अजिबात रिप्लाय देऊ नये, असं देखील सांगता आलं. तसंच प्रॉम्प्टमुळे भविष्यात ११ टक्के कमी आक्षेपार्ह रिप्लाय मिळतील, असं देखील कंपनीनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

Paytm कडून मोठी मदत, २१ हजार ऑक्सिजन कंसंट्रेटरची दिली ऑर्डर

मॅनकाइंड फार्माचा व्यक्तिगत स्वच्छतेसाठी पुढाकार, सेफकाइंड ब्रँड सुरु

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा