Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

Paytm कडून मोठी मदत, २१ हजार ऑक्सिजन कंसंट्रेटरची दिली ऑर्डर

आता डिजीटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमनेही (Paytm) मदतीचा हात दिला आहे.

Paytm कडून मोठी मदत, २१ हजार ऑक्सिजन कंसंट्रेटरची दिली ऑर्डर
SHARES

कोरोनाच्या कठीण काळात अनेक कंपन्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. आपली सामाजिक जबाबदारी समजून मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गुगल कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला. आता डिजीटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमनेही (Paytm) मदतीचा हात दिला आहे.

Paytm नं २१ हजार ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी (Oxygen Concentrators) ऑर्डर दिली आहे. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देशात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की कंपनीनं जनतेकडून (Fund Raising) पाच कोटी रुपये जमा केले आहेत. त्यात आणखी पाच कोटी कंपनीनं स्वत:चे टाकून १० कोटी रुपयांचे ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे.

ऑक्सिजन कंसंट्रेटर्स हवेनं ऑक्सिजनला फिल्टर करतं आणि कमी ऑक्सिजन असणाऱ्या रुग्णांना मदत करतं. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की पेटीएम फाउंडेशननं (Paytm Foundation) तात्काळ २१ हजार ऑक्सिजन कंसंट्रेटर्स आयात करण्याची ऑर्डर दिली आहे.

कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा कोविड मदत कार्यात वैद्यकीय कौशल्य असलेल्या समर्पित संघाचं नेतृत्व करत आहेत. हे उपकरण त्वरित सराकारी रुग्णालयं, कोविड केअर सेंटर्स, खासगी रुग्णालयं, नर्सिंग होम आणि रेजिडेंट वेलफेयर असोसिएशनला पाठवले जातील.हेही वाचा

Exclusive : कोरोना रुग्णानं जेवणाच्या डब्यातून पाठवलं 'सोन्याचं' रिटर्न गिफ्ट, वाचा सविस्तर

Exclusive : कोरोना रुग्णानं जेवणाच्या डब्यातून पाठवलं 'सोन्याचं' रिटर्न गिफ्ट, वाचा सविस्तर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा