Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

Exclusive : कोरोना रुग्णानं जेवणाच्या डब्यातून पाठवलं 'सोन्याचं' रिटर्न गिफ्ट, वाचा सविस्तर

तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल. नुकतंच, एका महिलेनं त्यांना डब्यात रिटर्न गिफ्ट दिलं. पण...

Exclusive : कोरोना रुग्णानं जेवणाच्या डब्यातून पाठवलं 'सोन्याचं' रिटर्न गिफ्ट, वाचा सविस्तर
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जागेच्या कमतरतेमुळे काहींना घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र या रुग्णांचे जेवणाचे हाल होत आहेत. हेच पाहून आता अनेक संस्था, टिफिन सर्विसेस त्यांच्या मदतीला सरसावल्या आहेत.

सामाजिक बांधिलकी जपत आणि लोकांची गरज ओळखून विलगीकरणात असणाऱ्यांसाठी डबे पोहोचवण्याचा व्यवसाय अनेकांनी सुरू केला आहे. बाजारातून भाजी निवडून आणण्यापासून त्याचे निर्जंतुकीकरण करणे, स्वयंपाक बनवून त्याचे नीट पॅकिंग करणे, डबे पोहोचवणे यामध्ये अनेक अडचणींचा सामना करत हसतमुखाने मदत करत आहेत.

असंच काहिसं काम दहिसरमधील समस्त महाजन समाज ही संस्था करत आहे. ही संस्था दहिसर, कांदिवली, बोरिवली परिसरांतील गृहविलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांना घरपोच जेवण देते. दिवसाला जवळपास ५०० हून अधिक लोकांना जेवणाचा पुरवठा केला जातो.

संस्थेच्या कामाचं सर्वत्र कौतुक तर होतच आहे. शिवाय संस्थेला मदत करण्यासाठी लोकं स्वत:हून पुढे येत आहेत. तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल. नुकतंच, एका महिलेनं त्यांना डब्यात रिटर्न गिफ्ट दिलं. हे गिफ्ट साधंसुधं नव्हतं. तर डब्यात  चक्क सोन्याच्या बांगड्या ठेवलेल्या होत्या.

कोरोनाग्रस्त असलेले रुग्ण समस्त महाजन या संस्थेशी संपर्क साधतात. संपर्क साधलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांचा डबा डिलिव्हरी बॉय मार्फत घराच्या बाहेर ठेवले जातो. दुसऱ्या दिवशी रिकामा डबा घराबाहेरूनच घेतला जातो. पण एकादिवशी रिकाम्या डब्यात जे सापडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. डब्यामध्ये चक्क सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या.

नेहमीप्रमाणे आमचा मुलगा घराबाहेरील डबे घेऊन आला. ते डबे साफ करताना डब्यात आम्हाला सोन्याच्या बांगड्या सापडल्या. आम्ही डबा कुठून आला आहे? याची माहिती घेऊन त्या महिलेशी संपर्क साधला. त्या महिलेशी बोलल्यावर आम्ही चकितच झालो.

ती महिला म्हणाली की, या कठिण परिस्थितीत माझ्यासोबत कुणी नाही. पण तुम्ही मला नियमित डबा दिलात. त्यामुळे मी या सोन्याच्या बांगड्या तुम्हाला देत आहे. जेणेकरून तुम्ही माझ्यासाराख्या नागरिकांची मदत करू शकाल. मी त्या महिलेची समजूत काढली आणि ते दागिने पुन्हा केले.   

गिरीष शहा, सदस्य, समस्त महाजन

गिरीष यांच्यानुसार, असे अनुभव त्यांना रोजच येतात. त्यांनी सांगितलं की, नुकतंच त्यांच्या ऑफिसबाहेर एकानं अन्नधान्यानं भरलेली एक गाडी पाठवली. मात्र मदत करणाऱ्यानं स्वत:चं नाव उघड केलं नाही. बरेच अज्ञात लोकं स्वत:चं नाव न सांगता मदतीचा हात पुढे करत आहेत.

इतर वेळी जरी आपण जात, धर्म यावरून भांडत असलो तरी कठिण प्रसंगी आपण एकत्र येतोच. त्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असो पण आजही माणुसकी जिवंत आहे हे याच उदाहरणांवरून म्हणता येऊ शकते.  

समस्त महाजन समाज

संपर्क : ०९८२००२०९७६

वेबसाईट : http://www.samastmahajan.org/हेही वाचा

मॅनकाइंड फार्माचा व्यक्तिगत स्वच्छतेसाठी पुढाकार, सेफकाइंड ब्रँड सुर

मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा