Advertisement

होम क्वारंटाईन आहात? 'हे' ५ टिफिन सर्विसेस पुरवतात घरगुती जेवण

तुम्ही देखील कोरोनाबाधित असाल आणि जेवणं करणं शक्य नसेल तर या टिफिन सर्विसेसची मदत घेऊ शकता. यात पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचे टिफिन प्रोवायडर मोफत डबा पुरवतात...

होम क्वारंटाईन आहात? 'हे' ५ टिफिन सर्विसेस पुरवतात घरगुती जेवण
SHARES

कोरोनाबाधित बरेच रुग्ण घरातच क्वारंटाईन (Home Quarantine) आहेत. करोनाबाधित रुग्णांना (corona patients) अशक्तपणामुळे जेवण बनवणं शक्य नसल्यानं अनेक कुटुंबांपुढे रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गृहविलगीकरणात असलेल्या करोनाबाधित रुग्णांना घरचं जेवण (Home made food) मिळावं यासाठी मुंबईतील काही टिफिन सर्विस पुरवणाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

तुम्ही देखील कोरोनाबाधित असाल आणि जेवणं करणं शक्य नसेल तर या टिफिन सर्विसेसची मदत घेऊ शकता. ज्या तुम्हाला घरपोच जेवण पुरवतील.


१) समस्त महाजन संस्था

दहिसर इथली समस्त महाजन संस्था दहिसर, कांदिवली, बोरिवली परिसरांतील गृहविलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांना घरपोच जेवण देते. दिवसाला जवळपास ५०० हून अधिक लोकांना जेवणाचा पुरवठा केला जातो. यामध्ये चपाती, दोन भाज्या, भात आणि एक गोड पदार्थ पुरवले जातात.

संपर्क : ०९८२००२०९७६

वेबसाईट : http://www.samastmahajan.org/


२) आजीचा डबा

आजीचा डबा टिफिन सर्विस ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली. अरुण पोखरीयाल आणि शीतल कुरुप यांनी मिळून ही टिफिन सर्विस सुरू केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता त्यांनी सध्या मोफत टिफिन सर्विस सुरू केली आहे. सध्या त्यांच्याकडून ४० डबे घारत पोहोचवले जातात. टिफिनमध्ये ३ चपात्या तूप लावलेल्या, दोन भाज्या, वरण-भात असं जेवणं असतं. दोन जण मिळून एक डबा खाऊ शकतात.

संपर्क : ९८३३५१७२८२ (अरुण पोखरीयाल)

९५३७८८२८२८ (शीतल कुरुप)


३) आशा किचन

बिझनेसमन असलेले राजीव मुंबईच्या दहिसर परिसरात राहतात. माहिम ते भाईंदर इथल्या लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्यासाठी सिंघल यांनी मालाडच्या आशा किचनची मदत घेतली आहे. आशा किचन चालवत असलेल्या संचाकल आशा भरतिया आणि कृष्णा भरतिया यांनी आपल्या 1BHK घराला किचनमध्ये रुपांतरीत करुन लोकांची मदत करणं सुरू केलं आहे.

दोघंही पति-पत्नी रोज २०० लोकांसाठी दोन वेळचं जेवण बनवून होम क्वारंटाइन राहत असलेल्या लोकांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचत आहेत. पण सध्या त्यांनी अग्रवाल समाजासाठी मोफत टिफिन सर्विस सुरू केली आहे. तर इतरांसाठी ते २२० रुपये आकारतात.  

संपर्क : ०२२ २८७३८२३९ / ९९२०१६०६६९ / ९८२०१८६६६९

४) राजपुरीया किचन

मुंबईच्या विलेपार्लेच्या राजपुरिया किचन चालवत असलेले योगेंद्र राजपुरियाही करत आहेत. ते म्हणतात की, त्यांच्या किचनमधून दररोज जवळपास 200 लोकांसाठी जेवण बनवले जात आहे.

संपर्क : ९८२००६१०८६

५) अनूज किचन

अनूज किचनमध्ये फक्त दुपारचे जेवण पुरवले जाते. त्यांना एक दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते. दक्षिण मुंबईतल्या क्वारंटाईन नागरिकांसाठी ते जेवण पुरवतात. त्यांच्या डब्यात दोन भाज्या, चपाती, डाळ-भात, सलाडचा समावेश असतो. यासाठी ते २२५ रुपये आकारतात.  

संपर्क : ९९२०७२४८१७



हेही वाचा

कार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा