Advertisement

कार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या

मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्र काही नियमांसह सुरू राहील असं, सरकारनं आदेशात म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी अनेक नियम लागू केले आहेत.

कार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या
SHARES

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व खाजगी कार्यालयं बंद केली आहेत. मात्र, सहकारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँका, बीएसई आणि एनएसई, वीजपुरवठ्याशी संबंधित कंपन्या, टेलिकॉम सर्व्हिस पुरवठादार, विमान आणि मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन आणि वितरण व्यवस्थपानासाठी फार्मास्युटिकल कंपनीचे ऑफिस वगळता खासगी कार्यालयं बंद राहतील, असं महाराष्ट्र सरकारनं स्पष्ट केले आहे. 

तसंच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्र काही नियमांसह सुरू राहील असं, सरकारनं आदेशात म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी अनेक नियम लागू केले आहेत. 

नियम

- एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वैद्यकीय रजा द्यावी. गैरहजर असल्या कारणाने त्याला नोकरीतून कमी करता येणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याला आजारी रजा द्यावी लागेल. तसंच त्यादरम्यान त्याला पूर्ण पगार देणं बंधनकारक आहे.

- एखादा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास संबंधित यूनिट पूर्णपणे सॅनिटाईज होत नाही तोपर्यंत बंद करावं.

-  कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना भरपगारी क्वारंटाईन करावं.

- फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये कुठल्याही कामगाराला प्रवेश देण्याआधी त्याच्या शरीराचं तापमान मोजावं.

- सर्व कर्मचाऱ्यांचं सरकारच्या निकषांनुसार लसीकरण करावं.

- ज्या फॅक्टरींमध्ये ५०० हून अधिक कर्मचारी आहेत, त्यांनी स्वत:ची क्वारंटाईन सुविधा तयार करावी.

लंच आणि ब्रेक यांच्या वेळांमध्ये विभाजन करावं, जेणेकरून गर्दी होणार नाही. 

-  कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

लाॅकडाऊनमध्ये खासगी कार्यालये बंद, 'ही' कार्यालयं असतील सुरू

लॉकडाउनमध्ये नोकरी नाही? घरी बसून 'हे' काम करा, चांगली कमाई होईल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा