Advertisement

गुगलचं 'हे' अॅप वापराल तर मोबाइल कायमचा गमवाल

आता मात्र हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल की गुगलचं गुगल असिसटंट (Google Assistant) हे अॅप हॅक झालं असल्याची सध्या चर्चा आहे.

गुगलचं 'हे' अॅप वापराल तर मोबाइल कायमचा गमवाल
SHARES

गुगल अॅप्सवरून आपण सर्वच अॅप डाऊनलोड करतो. पण तुम्हाला सांगितलं की या गुगल अॅपवरच हॅकर्सची नजर आहे तर? हे ऐकूनच तुम्ही चिंतेत पडला असाल. कारण गुगल वरच लॉग ईन करून तुम्ही खाजगी माहिती देता. नावासोबतच आपला पत्ता, मोबाईल नंबर, जन्म तारीख असं बरंच गुगलला माहित असतं. याचा हॅकर्स दुरुपयोग करू शकतात.


गुगलचं अॅप हॅक 

आता मात्र हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल की गुगलचं गुगल असिस्टंट (Google Assistant) हे अॅप हॅक झालं असल्याची सध्या चर्चा आहे. अनेक युझर्सनी याबाबतच्या तक्रारी देखील गुगलकडे केली आहे. 


अॅप वापरल्यास काय होईल?

गुगल असिस्टंट हे अॅप वापरताच तुम्हाला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अॅपवर हे गुगल (Hey Google) किंवा ओके गुगल (Ok Google) असं बोलताच तुमच्या फोनची स्क्रीन अचानक फ्रीझ होऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी स्क्रीन बंद होत नसल्याची तक्रार अनेक युझर्सनी गुगलकडे केली आहे. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी खूपच लवकर डिस्चार्ज होईल आणि काही वेळेस तर फोनचा डिस्प्लेही खराब होऊ शकतो.



स्नॅपचाटला टक्करं देणारं इन्स्टाग्रामचं नवीन अॅप

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय? मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा