Advertisement

पैशांचा व्यवहार करण्यासाठी Google Pay आकारणार शुल्क

‘गुगल पे’चा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता ग्राहकांना गुगल पेद्वारे मोफत पैशांचा व्यवहार नाही करता येणार.

पैशांचा व्यवहार करण्यासाठी Google Pay आकारणार शुल्क
SHARES

आपल्यापैकी बरेच जण पैशांचा व्यवहार करण्यासाठी 'गुगल पे'चा वापर करतात. पण आता ‘गुगल पे’चा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता ग्राहकांना गुगल पेद्वारे मोफत पैशांचा व्यवहार नाही करता येणार. यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे.

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या गुगल पे ने पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी (Peer to peer payments facility) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर (Instant Money Transfers) पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. ज्याकरता युजर्सना काही शुल्क द्यावे लागेल. दरम्यान हे शुल्क किती असेल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे.

Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा देते. दरम्यान गुगलकडून नोटीस जारी होऊन WEB APP बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी युजर्स २०२१ च्या सुरुवातीपासून Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर नाही करू शकणार.

याकरता युजर्सना Google Pay चा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे Google कडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, Google Pay च्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केलं जाईल.

Google कडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. Googe कडून गेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि ios युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहेत. कंपनीनं Google Pay च्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.


हेही वाचा

'डिसअपिअरिंग मेसेज’ फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर 'असं' सुरू करा

ऑक्सफर्ड डिक्शनरीत मोठे बदल, लिंगभेद करणारे शब्द टाळणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा