Advertisement

वाईट सवयी सोडल्या नाहीत, तर हे वॉच देईल शॉक!


वाईट सवयी सोडल्या नाहीत, तर हे वॉच देईल शॉक!
SHARES

स्मोकिंग, ड्रिंकिंग, प्रमाणापेक्षा जास्त झोपणं, नखं खाणं किंवा इतर वाईट सवयींपासून पिच्छा सोडवायचाय? पण कितीही प्रयत्न केले तरी काही शक्य होत नाही. मग तुम्हाला शॉक ट्रीटमेंटची गरज आहे! शॉक दिल्याशिवाय तुमच्या वाईट सवयी सुटणार नाहीत! घाबरू नका, शॉक देण्यासाठी तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही. वाईट सवयी सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त 'पॅव्हलॉक' या ब्रँडचं घड्याळ हातात घालावं लागणार आहे. पण फक्त हातात साधं घड्याळ घालून वाईट सवयी कशा सुटतील? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. या घड्याळाला साधं सुधं समजत असाल तर थांबा! या घड्याळाची बातच काही और आहे.



पॅव्हलॉक वॉच गॅझेटची खासियत

आपल्यापैकी अनेकांना वाईट सवयी असतात. मग कुणाला ड्रिंकिंग, स्मोकिंगची तर कुणाला जास्त झोपण्याची, सकाळी व्यायाम न करण्याची किंवा अनहेल्दी फूड अशा अनेक सवयी आपल्याला असतात. पण या घड्याळाच्या मदतीनं तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडवू शकता. पॅव्हलॉक वॉचची खासियत म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल, पण तरीही तुम्ही ती करत असाल तर प्रत्येक वेळी एक शॉक मिळेल. अशाप्रकारे तुमच्या मेंदूला ती गोष्ट पुन्हा न करण्याचा संदेश जाईल.



उदाहरणार्थ स्मोकिंग तुम्हाला सोडायचं आहे. पण काही केल्या ही सवय सुटत नाही. मग अशावेळी हे घड्याळ तुमची मदत करेल. यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की, पॅव्हलॉकचं अॅप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जी सवय मोडायची असेल, त्याचं नाव निवडायचं. सो तुम्ही जेव्हा सुद्धा ती वाईट गोष्ट करण्याचा प्रयत्न कराल किंवा विचार कराल तेव्हा तुम्हाला एक शॉक मिळेल. वारंवार मेंदूला शॉक मिळाल्यानं ती गोष्ट पुन्हा करायची नाही, असा संदेश मेंदूला जाईल आणि मेंदूला आणि पर्यायाने आपल्याला चांगली सवय लागेल.



हे घड्याळ धोकादायक नाही

पॅव्हलॉक घड्याळाचं डिव्हाईस ५० ते ४५० व्होल्टचा शॉक तुम्हाला देऊ शकतो. हे डिव्हाईस अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे, की तुम्हाला त्यापासून काही धोका नाही. पण शॉक लागल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटेल. हे घड्याळ सीई आणि एफसीसी सर्टिफाईड आहे.



पॅव्हलॉक या घड्याळाचा तुम्ही अलार्मक्लॉक म्हणूनही वापर करू शकता. पण या घड्याळासाठी तुम्हाला २६ हजार ४५० रुपये मोजावे लागतील. अॅमेझॉनवर देखील तुम्ही घड्याळाची ऑर्डर देऊ शकता. जर वाईट सवयी मोडण्यासाठी तुम्ही इतके पैसे मोजायला तयार असाल, तर त्यांच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा