Advertisement

‘इंडियन आयडल मराठी’चा विजेता ठरला पनवेलचा सागर म्हात्रे

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

‘इंडियन आयडल मराठी’चा विजेता ठरला पनवेलचा सागर म्हात्रे
SHARES

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे.

‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. या महापर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. काही दिवसांपूर्वी यातील टॉप ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

इंडियन आयडलमध्ये जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले होते. त्यातील पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे. सागरच्या आवाजानं रसिकांच्या मनात घर केलं आहे.

सागर म्हात्रे हा पेशानं इंजिनियर आहे. सागरनं अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांचं मन जिंकलं.हेही वाचा

अल्लू अर्जुनचा स्वॅग, नाकारली तंबाखू कंपनीची करोडोंची ऑफर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा