Advertisement

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराला जीवे मारण्याची धमकी

आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराला जीवे मारण्याची धमकी
SHARES

तारक मेहताचा उल्टा चश्मा शो टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. तारक मेहता पाहणाऱ्यांना गोगी कोण हे काही वेगळं सांगायची गरज नाही. काही गुंडांनी गोगी म्हणजेच समय शाहा यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. 

समय शाहा यांनी स्वत: ही माहिती सामायिक करून चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

साम शाहनं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करताना लिहिलं आहे की, "हा माणूस दोन दिवसांपूर्वी माझ्या इमारतीत आला आणि मला विनाकारण धमकावू लागला. मला माहित नाही हा कोण आहे? मला का धमकी देत आहे? त्यानं मला ठार मारण्याची धमकी दिली आहे. मी ही माहिती आपणा सर्वांना देत आहे कारण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना त्याबद्दल माहिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.

प्राप्त माहितीनुसार सामनं बोरिवली पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली आहे. साम बोरिवलीतील एका इमारतीच्या तळ मजल्यावर राहतो.हेही वाचा

महाराष्ट्राच्या फेवरेट 'सई -सोनाली' आता चिंगारी अॅपवर!

विरोधानंतर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव बदललं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement