दामोदरमध्ये रंगणार बालनाट्य स्पर्धा

  Parel
  दामोदरमध्ये रंगणार बालनाट्य स्पर्धा
  मुंबई  -  

  लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काच व्यासपीठ मिळावं यासाठी अनेक वर्षापासून बालनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेचं हे ३३ वं वर्ष आहे. या वर्षी एकूण २२ बालनाट्य या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. परळच्या दामोदर हॉलमध्ये ६, ७ आणि ८ डिसेंबरला ही बालनाट्य स्पर्धा रंगणार आहे.


  या स्पर्धेमागचा उद्देश काय?

  प्रा. मधूकर तोरमडलकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ही स्पर्धा घेतली जाते. संपत चाललेली बालनाट्य संस्कृती पुन्हा जीवंत व्हावी या उद्देशातून ही स्पर्धा घेतली जाते. गेले ३३ वर्ष सुरू असलेल्या या स्पर्धेनं अनेक अभिनेते या चित्रपटसृष्टीला दिलं आहे. मुख्य म्हणजे मुंबई आणि उपनगरातील शाळांमधून या स्पर्धेत बालनाट्य सहभागी होतात. यावेळी दररोज ८ बालनाट्यांची पर्वणीच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


  गेले ३३ वर्ष बालनाट्य स्पर्धेचं आयोजन अविरतपणं सुरू आहे. लहान मुलांमध्ये अभिनय दडलेला असतो. पण त्यांना योग्य व्यसपीठ मिळत नाही. पूर्वी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बालनाट्य शिबिरांचे आयोजन केलं जायचं. पण आता हळूहळू ही संस्कृती संपत चालली आहे. याआधी आम्ही अगदी नाममात्र तिकीट या स्पर्धेसाठी लावायचो. पण आता पूर्णपणे मोफत बालनाट्य स्पर्धा भरवली जाते.

  - अशोक परब, आयोजक

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.