Advertisement

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चं नाबाद त्रिशतक

महाराष्ट्रातील नाट्यरसिकांना 'डोण्ट वरी बी हॅप्पी' करणाऱ्या या नाटकाचा ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये त्रिशतकी प्रयोग रंगणार आहे. पती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच गोजिऱ्या नात्यावर भाष्य करणारं हे नाटक रसिकप्रेक्षकांना आजही मोहिनी घालण्यास यशस्वी ठरत आहे.

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चं नाबाद त्रिशतक
SHARES

कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारं 'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक आता त्रिशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे.




गडकरीमध्ये त्रिशतकी प्रयोग 

महाराष्ट्रातील नाट्यरसिकांना 'डोण्ट वरी बी हॅप्पी' करणाऱ्या या नाटकाचा ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये त्रिशतकी प्रयोग रंगणार आहे. पती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच गोजिऱ्या नात्यावर भाष्य करणारं हे नाटक रसिकप्रेक्षकांना आजही मोहिनी घालण्यास यशस्वी ठरत आहे. कारण, आजच्या बहुमाध्यमांच्या काळात एखादं नाटक ३०० व्या प्रयोगांपर्यंत मजल मारणं ही खरच असाध्य गोष्ट असून, या नाटकानं ते साध्य करून दाखवलं आहे.


स्वानंदीच्या रूपातील नवी प्रणोती 

सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित, मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या  नाटकातील उमेश कामत आणि स्वानंदी टिकेकर ही जोडी हिट ठरत आहे. या नाटकाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास पाहता, स्पृहा जोशीने गाजवलेल्या प्रणोती या व्यक्तिरेखेला स्वानंदी टिकेकरने उत्तम न्याय दिला आहे. स्वानंदीच्या रूपातली ही नवी प्रणोती पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा नाटक पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.


वैवाहिक जीवनाची व्यथा

आजच्या तरुण पिढीच्या वैवाहिक जीवनाची व्यथा सांगणाऱ्या या नाटकानं वैवाहिक दाम्पत्यांसाठी काऊन्सिलिंगचं काम केलं आहे. वर्कहोलिक जगात स्वतःसाठी वेळ काढू न शकणाऱ्या जोडप्यांना हे नाटक एकत्र आणण्यास यशस्वी ठरत आहे.



हेही वाचा -

चाळीशीतील महिलांची कथा सांगणार ‘नॉटी ४t’

Exclusive: 'एक' चेटकीण करतेय अाबालवृद्धांवर जादू!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा