Advertisement

चालू प्रयोगादरम्यान वैभव मांगले स्टेजवर कोसळले, 'अलबत्या गलबत्या'नाटकातील घटना


चालू प्रयोगादरम्यान वैभव मांगले स्टेजवर कोसळले, 'अलबत्या गलबत्या'नाटकातील घटना
SHARES

अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या नाटकाचा प्रयोग सांगली इथं सुरू होता. प्रयोग संपायला अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना ही घटना घडली.

नियोजित वेळेनुसार सांगलीतील नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरू होता. प्रयोग संपायला केवळ ५ मिनिटांचा वेळ शिल्लक असताना मांगले यांना अचानक स्टेजवरच चक्कर आली. त्यामुळे नाटक तातडीने थांबवून डाॅक्टरांना बोलावण्यात आलं. प्रथोमोपचार केल्यावर मांगले यांना जवळच्या क्रांती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डिहायड्रेशनमुळे मांगले यांना चक्कर आल्याचं समजत आहे.

नाटकाचा ५ मिनिटाचा प्रयोग शिल्लक असताना अति उकाड्यामुळे वैभवला चक्कर आली. मात्र ५ मिनिटांत योग्य तो उपचार घेऊन वैभवने संपूर्ण प्रयोग पूर्ण केला. सध्या वैभव बरा असून आराम करत आहे.
निर्माता- राहुल भंडारे

अलबत्या गलबत्या या नाटकाचे सध्या राज्यभर प्रयोग सुरू आहेत. या नाटकात चेटकीणीची भूमिका साकारणारे अभिनेते वैभव मांगले यांच्या अदाकारीवर तर प्रेक्षक जाम खूश आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्रयोगाचं शतक साकारतानाच 'गलबत्या'च्या टीमने या नाटकाचे एकापाठोपाठ एक असे ५ प्रयोग केले होते.

संबंधित विषय
Advertisement