Advertisement

Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९८ व्या नाट्यसंमेलनाला मुलुंड येथील प्रियदर्शनी क्रिडा संकुल, महाकवी कालिदास नाट्यमंदिर इथं बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी कलेच्या या सोहळ्याला राजकारणाचं गालबोट लागल्याचा आरोप करीत विनोद तावडे आणि प्रसाद कांबळी यांना 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना खडेबोल सुनावले आहेत.

Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड
SHARES

बुधवारपासून मुलुंड इथं सुरू होणाऱ्या ९८ व्या नाट्यसंमेलनापूर्वीच नाराजीची घंटा वाजली आहे. नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना धारेवर धरलं आहे. नार्वेकर यांच्या नाराजीमागचं कारण आहे, कलाक्षेत्रात सुरू असलेलं राजकारण.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९८ व्या नाट्यसंमेलनाला मुलुंड येथील प्रियदर्शनी क्रिडा संकुल, महाकवी कालिदास नाट्यमंदिर इथं बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी कलेच्या या सोहळ्याला राजकारणाचं गालबोट लागल्याचा आरोप करीत विनोद तावडे आणि प्रसाद कांबळी यांना 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना खडेबोल सुनावले आहेत.


लता नार्वेकरांचं पत्र

लताबाईंनी नाट्य परिषदेच्या सहकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रकृती ठणठणीत असली तरी नाट्यसंमेलनाला न येण्याचं कारण त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. यंदाच्या नाट्यसंमेलनाला न येण्याच्या कारणांचा खुलासा करत आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे.तावडेंच्या कार्यपद्धतीवर नाखूश

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे भेदभाव करतात. नाट्यसंमेलनातही ते राजकारण आणत आहेत. यापूर्वी त्यांना कधीच नाट्यसंमेलनाची गोडी लागली नाही. मोहन जोशी अध्यक्ष असताना नाट्यसंमेलनापासून दूर पळणारे तावडे प्रसाद कांबळी अध्यक्ष झाल्यावर कसे जवळ आले? असा सवालही लताबाईंनी केला आहे.


४ वर्षांनी आली आठवण?

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना मागील ४ वर्षे नाट्यसंमेलनाची आठवण झाली नाही. पंढरपूरचं संमेलन दूर होतं म्हणून ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर बेळगावच्या संमेलनातही तीच सबब... ठाणे येथील संमेलनात कार्यक्रम संपल्यावर केवळ हजेरी लावायला आले. मागच्या वर्षी उस्मानाबादलाही गैरहजर.तावडेंची राजकीय खेळी...

मागील काही दिवसांपासून तावडे नाट्यपरिषदेच्या मागे-पुढे करत आहेत. कार्यालयाच्या उद्घाटनालाही आले. उद्या नाट्यसंमेलनालाही उपस्थित राहतील, पण त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठीही ते गेले होते. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले नाहीत. हे राजकारण नाही का?


निवडणुकीमुळे जाग आली?

विनोद तावडेंची ही खेळी २०१९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू असल्याचं लताबाई म्हणतात. कर्नाटकमध्ये काय झालं ते सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे महाराष्ट्रातही सत्ता गेली, तर शेवटच्या नाट्यसंमेलनाला तरी हजर राहूया या भावनेतूनही कदााचित ते असे वागत असतील, पण ते येणार असतील तर आपण येणार नसल्याचं लताबाईंनी म्हटलं आहे.प्रसाद कांबळीवरही तोंडसुख

हे नाट्यसंमेलन नाट्यकर्मींचं आहे, नाट्यपरिषदेचं आहे की, भद्रकाली प्रोडक्शनचं? हा प्रश्न निमंत्रण पत्रिका पाहिल्यावर मनात येतो. कारण या पत्रिकेवर केवळ अध्यक्ष म्हणून प्रसाद कांबळीचंच नाव आहे. सेक्रेटरी, कार्यवाह, सहकार्यवाह आणि कोषाध्यक्षांची नावंच नाहीत. त्यामुळे नाट्यपरिषदेवर नेमका कोणाचा अंमल आहे? हा प्रश्न येतो.


भद्रकाली निर्मित की भाजप प्रस्तुत नाट्यसंमेलन?

हे सर्व चित्र पाहता यंदाचं नाट्यसंमेलन भद्रकाली निर्मित आणि भाजप प्रस्तुत असंच असल्याचं दिसतं. त्यामुळे अशा प्रकारच्या नाट्यसंमेलनाला आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचं लताबाईंनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं. अद्याप इतर कोणत्याही सहकाऱ्यांना यााबाबत सांगितलेलं नाही. झेंडा हाती घेऊन निषेधाचा मोर्चा काढणार नसले तरी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणं हे कर्तव्य मानत हे पत्र लिहिलं असल्याचं त्या म्हणाल्या.हेही वाचा-

सुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी!

'फर्जंद'ला प्राइम टाइम शो मिळेना! मनसे उतरणार रस्त्यावरसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा