Advertisement

नाटकांचा इतिहास जपणारं कलादालन उभारणार : उद्धव ठाकरे


नाटकांचा इतिहास जपणारं कलादालन उभारणार : उद्धव ठाकरे
SHARES

मागील दोन दिवसांपासून मुलूंड येथील कालिदास नाट्यगृहात सुरु असलेल्या ९८ व्या मराठी नाट्यसंमेलनाची शुक्रवारी सांगता झाली. या सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळीही व्यासपीठावर हजर होते. अभिनेता सुबोध भावे यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.


 बिर्ला क्रीडा केंद्रात कलादालन

लोककला, परंपरा यांचं दर्शन घडवणं म्हणजे केवळ मनोरंजन करणे नव्हे, असं म्हणत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, नाटक हा समाजमनाचा आरसा आहे. त्यामुळं नाटकांचा इतिहास दाखवणारं कलादालन उभारण्याची गरज आहे. हे कलादालन गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रात उभारलं जाईल असं वचन मी या व्यासपिठावरुन देतो. बालगंधर्व यांची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावे यांनी वाचून दाखवलेल्या चिठ्ठीनुसार बांद्रा येथील बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडेही कमी करण्यासाठी पावले उचलली जातील, असं ठाकरे म्हणाले. सध्या या नाट्यगृहाचे भाडे एका शो साठी ७५ हजार रुपये आहे.


राजकारण्यांच्या अंगीही नाना कला

एके काळी आम्हीदेखील स्त्री व्यक्तिरेखा साकरल्या असल्याचं सांगत सुशील कुमार शिंदे म्हणाले की, आयुष्यसुद्धा एक नाटकंच आहे. आम्ही मंत्री झालो, राजकारणी आहोत म्हणून या व्यासपीठावर येऊ नये असं काहीचं म्हणणं आहे. ते साफ चूक आहे. राजकारण्यांच्या अंगीही नाना कला असतात. खोटं वाटत असेल तर राऊत यांना विचारा. सलग ६० तास   चाललेलं हे नाट्यसंमेलन  खरोखर वेगळं  ठरलं. या पुढील सर्व नाट्यसंमेलने अशीच व्हायला हवीत. याशिवाय प्रत्येक नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं एक नाट्यगृह उभारण्यात यावं असंही शिंदे म्हणाले.हेही वाचा - 

संहिता अन् भव्यतेचा संगम घडवा: राज ठाकरे

Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड
संबंधित विषय