Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

मुंबईत पुन्हा 'या' कामसाठी झाडावर कुऱ्हाड?

पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी इथं रेल्वेवर पूल बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी १९९ झाडं हटवावी लागणार आहेत.

मुंबईत पुन्हा 'या' कामसाठी झाडावर कुऱ्हाड?
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी इथं रेल्वेवर पूल बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी १९९ झाडं हटवावी लागणार आहेत. तसंच, हँकॉक पुलाच्या उर्वरित कामासाठी आणखी ३२ झाडं हटवावी लागणार आहेत. या दोन्ही ठिकाणची झाडं हटवण्यासाठीचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीसमोर चर्चेस येणार आहेत.

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या महालक्ष्मी स्थानकावरील पुलांच्या बांधकामासाठी लॉकाडाऊनपूर्वी कंत्राट देण्यात आलं होतं. या पुलांच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे. डॉ. ई. मोझेस मार्गावरून आणि केशवराव खाडये मार्गावरून असे २ पूल बांधण्यात येणार आहेत. त्यामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

या २ पुलांसाठी ७८५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या पुलांच्या बांधकामाच्या जागी २६५ झाडे असून, त्यापैकी १९९ झाडं हटवावी लागणार आहेत. त्यापैकी १५३ झाडं कापावी लागणार असून, ४६ झाडे पुनरेपित करावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं वृक्ष प्राधिकरणाला पाठवला आहे. झाडं काढल्यानंतर १५ दिवसांत पूल विभागाच्या वतीनं महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात ४५० झाडे लावली जाणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा