Advertisement

रेल्वेचा प्रवाशांना मनस्ताप! हार्बरवरील १५ फेऱ्या रद्द


रेल्वेचा प्रवाशांना मनस्ताप! हार्बरवरील १५ फेऱ्या रद्द
SHARES

गुरुवारी सकाळपासूनच रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी पश्चिम रेल्वेवर झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त होत नाही तोच हार्बर रेल्वेमार्गावर मानसरोवर ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान दुपारी १२.३६ वाजता अोव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे पनवेलला जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे हार्बरवरील १५ फेऱ्या रद्द करण्यात अाल्या.


अोव्हरहेड वायर तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकल एकाच जागी खोळंबल्या होत्या. दुपारी १२.५० वाजता अोव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात अाली. तोपर्यंत बेलापूर ते पनवेल स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दरम्यान, हार्बर मार्गावर पाॅवर ब्लाॅक घेण्यात अाला.


जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प असल्याने हार्बर मार्गावरील पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी रस्तेमार्गाचा पर्याय स्वीकारला. रेल्वे प्रशासनानं दुरुस्तीचं काम पूर्ण केलं असलं तरी लोकल अद्यापही उशिरानं धावत अाहेत.



२२ ते २५ डिसेंबरच्या दरम्यान हार्बरवर १३ तासांचा ब्लॉक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा