Advertisement

२२ ते २५ डिसेंबरच्या दरम्यान हार्बरवर १३ तासांचा ब्लॉक


२२ ते २५ डिसेंबरच्या दरम्यान हार्बरवर १३ तासांचा ब्लॉक
SHARES

नेरुळ-सीवूड-उरण या नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्यासाठी येत्या २२ ते २५ डिसेंबरपर्यंत हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील नेरुळ ते बेलापूरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या चार दिवसांपैकी २५ डिसेंबरला एकूण १३ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.


७०० कर्मचारी तैनात

बेलापूर-उरणदरम्यान नवीन मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. २४ आणि २५ च्या मध्यरात्री २ वाजल्यापासून या ब्लॉकला सुरुवात होणार आहे. या कामासाठी एकूण ७०० कर्मचारी तैनात करण्यात येतील. दरम्यान फक्त सीएसटीएम ते नेरुळपर्यंत या लोकल गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉकदरम्यान सीएसटीएम ते नेरुळपर्यंतच लोकल गाड्या चालवण्यात येतील.


असं होणार काम

नेरुळ-सीवूड-उरण या २८ किलोमीटरच्या नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचं नियोजन करण्यात आलं आहे. या मार्गातील नेरुळ ते खारघर हा पहिला आठ किलोमीटरचा टप्पा मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. तर, उर्वरित दुसरा टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या नवीन मार्गामुळे नवी मुंबई उरणशी जोडली जाणार आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वेकडून या मार्गावर प्रवाशांसाठी नवीन लोकलही चालवण्यात येईल.

हार्बर रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर १३ तासांचा मेगाब्लॉक येईल. या ब्लॉकदरम्यान १६४ सेवा रद्द करण्यात येतील. तर, ट्रान्सहार्बरवरील ४० सेवा रद्द करण्यात येईल.


प्रवाशांसाठी पर्याय

पहिल्या तीन दिवसांत छोटे ब्लॉक घेऊन काम केले जातील. त्यावेळीही काही प्रमाणात लोकल गाड्या रद्द करण्यात येतील. त्यावेळी, बेलापूर स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि ३ वरूनच लोकल गाड्या चालवण्यात येतील. तर फलाट दोन बंद ठेवण्यात येईल. नेरुळनंतर पनवेलपर्यंत लोकल गाड्या धावणार नाही. बेलापूर स्थानकाजवळच दोन छोटे बोगदे असून एका बोगद्यातून सध्या लोकल वाहतूक होते. तर दुसऱ्या बोगद्यातून नवीन मार्ग बनवण्याचं काम सुरू आहे. या कामाला ब्लॉकदरम्यान गती दिली जाणार आहे. रुळांसह अन्य काही तांत्रिक कामं केली जाणार असल्यानेच ब्लॉक घेतला जाणार आहे.


पहिला टप्पा कुठून होणार सुरू?

नेरुळ-सीवूड-उरण प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात १९९७ मध्ये सुरुवात करण्यात आली. अनेक अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडत गेला. त्यामुळे ५०० कोटी रुपयांचा असलेल्या प्रकल्पाचा खर्च आता १ हजार ७१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा प्रकल्प सिडको आणि मध्य रेल्वेकडून भागिदारीत केला जात आहे. या मार्गावर ११ स्थानकं असतील आणि ८ किलोमीटरचा पहिला टप्पा खारकोपर या नवीन स्थानकापर्यंत सुरू केला जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा