Advertisement

बेस्ट, रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू


बेस्ट, रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
SHARES

मुंबईत आतापर्यंत बेस्ट, रेल्वेच्या १६८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये बेस्टचे कर्तव्यावर असलेल्या ९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतरही बेस्ट, पश्चिम व मध्य रेल्वेचे कर्मचारी कर्तव्यावरच होते. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य प्रवाशांनाही प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली. परिणामी बेस्ट, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर कोरोनाकाळात ताण वाढला. त्यातच ते अनेकांच्या संपर्कात येऊ लागले. आतापर्यंत बेस्टचे ३३१० अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यात ३१२५ जण कोरोनामुक्त झाले असून ८० जणांवर उपचार सुरूआहेत. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन ९० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर १७ कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर नसताना करोनाची लागण झाली व उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुक्तीचे प्रमाण ९५ टक्के आहे. बेस्टमधील २६ हजार र्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून त्यापैकी १० हजार कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्राही घेतली आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या बाधित अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांवर मुंबईतील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार करण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या २२६१ आणि मध्य रेल्वेच्या १३५४ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. यात पश्चिम रेल्वेचे २०१९ आणि मध्य रेल्वेचे १२१४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले. मात्र अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक अशा पश्चिम रेल्वेच्या ९९ आणि मध्य रेल्वेच्या १३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रत्यक्षात मध्य रेल्वेचे ३३ आणि पश्चिम रेल्वेचे २८ कर्मचारी आहेत. मृत कर्मचाऱ्यांमध्ये मोटरमन, लोको पायलट, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांसह अन्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा