Advertisement

आतापर्यंत रेल्वेतील 'इतक्या' रेल्वे कर्मचारी, कुटुंबीय सदस्यांचा कोरोनामुळं मृत्यू

रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार केले जातात.

आतापर्यंत रेल्वेतील 'इतक्या' रेल्वे कर्मचारी, कुटुंबीय सदस्यांचा कोरोनामुळं मृत्यू
SHARES

'कोरोना' (coronavirus) या जीवघेण्या व्हायरसमुळं मध्य व पश्चिम रेल्वेच्या सेवेत असलेले कर्मचारी (railway workers) व त्यांच्या कुटुंबातील सदस्य अशा तब्बल २०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पश्चिम रेल्वेच्या (western railway) मुंबई विभागातील ७१ आणि मध्य रेल्वेवरील (central railway) १३१ जणांचा समावेश असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनामुळं झालेल्या मृतांमध्ये यात निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. शिवाय,  मध्य रेल्वेवरील सर्वाधिक कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. सध्याच्या घडीला २२ जण उपचार घेत आहेत. रेल्वेतील कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९१ टक्के आहे. 

कोरोनाबाधितांमध्ये मोटरमन, लोको पायलट, रेल्वे सुरक्षा दल व अन्य तांत्रिक कर्मचारी आहेत. सप्टेंबरपर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ६ ऑक्टोबपर्यंत रेल्वेतील मृतांची संख्या १९२ होती. त्यावेळी पश्चिम रेल्वेच्या ६३ आणि मध्य रेल्वेवरील मृतांची संख्या १२९ होती.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस घट असताना, राज्यात सोमवारी कोरोनानं ६५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश आल्याचं पहायला मिळतं आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात ५१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात २० जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा