Advertisement

मध्य रेल्वे स्थानकांत बसवणार २ हजार सीसीटीव्ही

मुंबईत मध्य रेल्वेने रोज ४२ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सुरक्षेवरही ताण पडत आहे.

मध्य रेल्वे स्थानकांत बसवणार २ हजार सीसीटीव्ही
SHARES

मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकांवर आता २ हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.  निर्भया निधीअंतर्गत हे कॅमेरे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बसवण्याची रेल्वेची योजना आहे. पुढील महिन्यापासून हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात होणार आहे. 

मुंबईत मध्य रेल्वेने रोज ४२ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सुरक्षेवरही ताण पडत आहे. त्यामुळे स्थानकांवर अधिक सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकात्मिक सुरक्षा आणि निर्भया निधीअंतर्गत विविध सुरक्षा उपाय केले जात आहेत. याअंतर्गत मध्य रेल्वे उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस स्थानकाचा थांबा असलेल्या स्थानकांत अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. त्यामुळे  सध्या मध्य रेल्वे मुंबई विभागात असलेल्या ३ हजार ३०० कॅमेऱ्यांमध्ये आणखी २ हजारपेक्षा जास्त कॅमेऱ्यांची भर पडेल. 

भायखळा, परळ, घाटकोपर, मुलुंड, दिवा, कोपर, डोंबिवली, कसारा, इगतपुरी, खोपोली, वडाळा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल यासह अन्य स्थानकांत निर्भयांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. याशिवाय  काही जुन्या कॅमेऱ्यांच्या जागी नवे कॅमेरे बसविले जाणार आहेत. तर काही नवीन ठिकाणी कॅमेरे बसविले जातील. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून स्थानकातील सोयीसुविधा आणि सुरक्षा तपासणीसाठी एक समिती नेमली होती. या समितीने अधिकाधिक कॅमेरे बसवून गुन्हे रोखण्याची सूचना केली होती.


हेही वाचा -

११ जानेवारीपासून एसटीचे सुरक्षा अभियान

रिक्षा-टॅक्सी चालकांची ३ रुपये भाडेवाढीची मागणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा