Advertisement

फुकट्या प्रवाशांकडून २१ कोटींचा दंड वसूल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.

फुकट्या प्रवाशांकडून २१ कोटींचा दंड वसूल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक जण हे विनातिकीट प्रवास करत आहेत. या प्रवाशांवर रेल्वेनं कारवाई केली असून, मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत ५ लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईतून २१ कोटी रुपयांहून अधिकची दंडाची रक्कम वसूल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असल्याने लोकलमधून अनेकजण नाईलाजास्तव विनातिकीट प्रवासाचाही प्रयत्न करत होते. तर काहीजण अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र बाळगून प्रवास करु लागले. असे प्रवासी सापडताच त्यांच्यावर तिकीट तपासनीसांकडून विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात आली.

एप्रिल २०२१ ते सप्टेंबर  २०२१ पर्यंत ५ लाख २७ हजार ६६३ विनातिकीट लोकल प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यात मध्य रेल्वेवरील ३ लाख २० हजार १९९ प्रवाशांवर के लेल्या कारवाईतून ११ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल क रण्यात आला. तर पश्चिाम रेल्वेवर २ लाख ७ हजार ४६४ विनातिकीट उपनगरीय प्रवासी पकडताना त्यांच्याकडून ९ कोटी ४२ लाख रुपये दंड प्राप्त केल्याचे सांगण्यात आले.

मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाचही विभागात याच कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या एकूण १२ लाख ४७ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई क रण्यात आली असून ७१ कोटी २५ लाख रुपये दंड वसूल के ल्याची माहिती देण्यात आली. यात मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर ३ लाख २० हजार १९९ विनातिकीट प्रवासी आढळले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा