Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटींचं विशेष अर्थसाहाय्य

मुंबईसह राज्यातील नागरिकांना स्वस्त: प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणारी एसटी सध्या तोटा सहन करत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटींचं विशेष अर्थसाहाय्य
SHARES

मुंबईसह राज्यातील नागरिकांना स्वस्त: प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणारी एसटी सध्या तोटा सहन करत आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देणं कठीण जात असून, कर्मचाऱ्यांना आर्थिक खर्च परवडत नाही. शिवाय, कोरोनाच्या काळात मोफत सेवा देऊन एसटीनं प्रवाशांना दिलासा दिला. मात्र, यावेळी चाक पूर्णपणे खड्ड्यात रुतून बसलं होतं. परंतू, या सर्व काळात आर्थिक स्थिती बिघडलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) राज्य सरकारनं बूस्टर दिलं आहे.

कर्मचाऱ्यांचे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतन भागविण्यासाठी ३०० कोटींचे विशेष अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, टप्प्याटप्प्यानं हा निधी वर्ग करण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीमुळं लॉकडाऊन लागू करण्यात आली होती. त्यामुळं बहुतांश एसटी बंद राहिल्यानं महामंडळाच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झाली.

रक्कम नसल्यानं कर्मचाऱ्याचं वेतन थकलं होतं. त्यामुळं राज्य सरकारनं १४ डिसेंबरला महामंडळाला १ हजार कोटींचं विशेष अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीसाठी प्रतिमहिना १५० कोटीप्रमाणे हा निधी दिला जाणार आहे. त्यानुसार, आतापर्यंत १५० कोटी देण्यात आले आहेत. तर गेल्या वर्षीच्या डिसेंबर व या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या वेतनासाठी प्रत्येकी १५० कोटीप्रमाणे एकूण ३०० कोटी नुकतेच सरकारकडून वितरित करण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा