Advertisement

महाराष्ट्रात ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

भविष्यात विद्युत वाहनांच्या वाढत्या वापराचा अंदाज घेऊन राज्य सरकारनं स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेहिकल प्रोत्साहनपर धोरण २०१८ तयार केलं असून पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी ही चार्जिंग केंद्रं उभारण्यात येणार आहे. यानुसार मुंबईत ४, ठाणे ६, नवी मुंबई-४, पनवेल-४, पुणे-१०, मुंबई-पुणे महामार्ग-१२ आणि नागपूर-१० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
SHARES

केंद्र सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून आता महाराष्ट्रात ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. महावितरणद्वारं ही केंद्रं उभारण्यात येणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

भविष्यात विद्युत वाहनांच्या वाढत्या वापराचा अंदाज घेऊन राज्य सरकारनं स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेहिकल प्रोत्साहनपर धोरण २०१८ तयार केलं असून पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी ही चार्जिंग केंद्रं उभारण्यात येणार आहे. यानुसार मुंबईत ४, ठाणे ६, नवी मुंबई-४, पनवेल-४, पुणे-१०, मुंबई-पुणे महामार्ग-१२ आणि नागपूर-१० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे.

२ लाख ५० हजार खर्च 

एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला अंदाजे २ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित असून मुंबई वगळता राज्यात विजेचा पुरवठा महावितरण करत असल्यानं महावितरणने राज्यात विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्रं उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. महावितरणतर्फे सदर प्रकल्प टप्प्या-टप्प्यात राबवण्यात येणार असून यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.

१६ ऑक्टोबरला उद्घाटन

सध्या नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रांत प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आलं असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपकेंद्राचं उद्घाटन करणार आहेत.

या ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र हे फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असणार आहेत. या केंद्रात एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटं ते १ तास एवढा कालावधी लागणार आहे. विद्युत वाहन चालकांना प्रती यूनिट ६ रुपये दर टीओडी तत्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येणार आहे. तसंच रात्री १० ते पहाटे ६ या कालावधीमध्ये वीज दरामध्ये १ रुपया ५० पैसे एवढी सुटही देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा