Advertisement

उन्हाळ्याच्या सुट्टीत चाकरमान्यांना दिलासा


उन्हाळ्याच्या सुट्टीत चाकरमान्यांना दिलासा
SHARES

मुंबई - उन्हाळी हंगामासाठी रेल्वे प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई बाहेर जाणाऱ्यांची संख्या पाहता यावर्षीही रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने तब्बल 626 उन्हाळी विशेष ट्रेनचे नियोजन केले असून यामुळे चाकरमान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांना होणारी गर्दी पाहता चाकरमान्यांना प्रवासात त्रास होऊ नये यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले असून पर्यटकांसाठी 1 एप्रिल ते 29 जूनपर्यंत जादा गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या आहेत विशेष फेऱ्या

सीएसटी - लखनऊ - सीएसटी 52
सीएसटी-जम्मू तवी-सीएसटी 26
एलटीटी-गोरखपुर-एलटीटी 26
एलटीटी-मण्डुआडिह-एलटीटी 24
अजनी (नागपुर)-मडगांव (गोवा)-अजनी 20
सीएसटी-सावंतवाडी रोड-सीएसटी 18
एलटीटी-करमाळी-एलटीटी 18
एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी 20
सेएसटी-पटना-सेएसटी 26
पुणे-एर्नाकुलम-पुणे 20
पुणे-पटणा-पुणे 26
पुणे-तिरुनेलवेली-पुणे 20
एलटीटी-साईनगर शिर्डी-एलटीटी 26
दादर-साईनगर शिर्डी-दादर 26
नागपूर-पुणे-नागपुर 22
पुणे-बिलासपुर-पुणे 26
एलटीटी-मण्डुआडिह-एलटीटी 2
कामाख्या-पुणे-कामाख्या 26
हजुर साहिब नांदेड-अजनी-हजुर साहिब नांदेड 26 हजरत निजामुद्दीन-पुणे-हजरत निजामुद्नी 26
जबलपुर-पुणे-जबलपुर 26
ओखा-साईनगर शिर्डी-ओखा 24
यशवंतपुर-पंढरपूर-यशवंतपूर 26
सांतरागाछी-पुणे-सांतरागाछी 26
गोरखपूर-सीएसटी-गोरखपूर 26
सियालदह-एलटीटी-सियालदह 22

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा