अत्याधुनिक बेस्ट बसेसचा लोकार्पण सोहळा

wadala
अत्याधुनिक बेस्ट बसेसचा लोकार्पण सोहळा
अत्याधुनिक बेस्ट बसेसचा लोकार्पण सोहळा
अत्याधुनिक बेस्ट बसेसचा लोकार्पण सोहळा
See all
मुंबई  -  

बेस्ट उपक्रमाने टाटा मोटर्सकडून 303 अत्याधुनिक बसेसची खरेदी केली असून त्यापैकी 75 बसगाड्या बेस्ट उपक्रमामध्ये दाखल झाल्या आहेत. याच अत्याधुनिक बेस्ट बसेसचा लोकार्पण सोहळा 25 एप्रिल रोजी वडाळा बस डेपो येथे पार पडला. या बससेसचा लोकार्पण सोहळा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. सोहळ्याचे अध्यक्षपद मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भूषवले. उपमहापौर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष, सभागृह नेते, गटनेते इत्यादी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली.

रेल्वे प्रमाणे बेस्ट बसेस देखील मुंबईची लाईफलाईन आहेत. तिची सुधारणा, क्षमता वाढवणे आपल्या सगळ्यांचे काम आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. अशा अत्याधुनिक बेस्ट बसेसच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आवश्यक बेस्ट पासेस, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड बसेस, बेस्ट अॅप या तीन गोष्टी भावी काळात अंमलात आणल्या जाव्यात ही इच्छा आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. अत्याधुनिक बेस्ट बसेस या लोकांच्या सेवेकरता असून त्या पुढील दोन दिवसांत प्रवाशांकरता उपलब्ध केल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

बसमधील अत्याधुनिक सुविधा

1) बसमध्ये युरो - 4 इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बसवण्यात आल्यामुळे बसचालकाला क्लचचा वापर करण्याची गरज नाही

2) बसच्या पुढीच्या आणि मागच्या दरवाजाच्या पहिल्या पायरीची उंची कमी आणि दरवाज्याची रुंदी वाढवली गेली

3) बसच्या मध्यभागी छताला मोठ्या क्षमतेची ब्लोअर सिस्टम बसवण्यात आली आहे

4) बसची लांबी नेहमीपेक्षा अधिक 12 मीटर करण्यात आली आहे

5) आसनांच्या बाजूला 8 मोबाईल चार्जर्स बसवण्यात आले आहेत

6) प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळण्याकरता बसच्या पाठीमागे एअर सस्पेंशन बसवण्यात आले आहे

7) दोन अासनांमधील अंतर वाढवण्यात आले आहे

8) बसच्या आतील भागात एलईडी ट्युबलाईट्समुळे बसमधील प्रकाशामध्ये सुधारणा तसेच दिव्यांचे आयुर्मान वाढणार

9) बसच्या आतील छताला प्री कोडेट अल्युमिनियम पत्रे बसवण्यात आले आहेत

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.