Advertisement

राज्यांतर्गत प्रवासासाठी ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित

मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या १६ व येणाऱ्या १६ गाड्यांचा समावेश आहे.

राज्यांतर्गत प्रवासासाठी ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित
SHARES

राज्य सरकारनं ई-पासाची अट रद्द केल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासासाठी बुधवारपासून बुकिंगही सुरू करण्यात आलं. त्यानुसार, मागील २ दिवसांत ८ हजार ५०१ तिकीटं आरक्षित करण्यात आली आहेत. त्याद्वारे १४ हजार ६०० प्रवासी प्रवास करणार असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.

मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या १६ व  येणाऱ्या १६ गाड्यांचा समावेश आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी या विशेष गाड्यांनाच महाराष्ट्रातील स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. याच गाड्यांतून प्रवास होणार असून नियमित गाड्या मात्र सुरू केलेल्या नाहीत. प्रवाशांना या गाड्यांचे १२० दिवस आगाऊ आरक्षण करता येणार आहे. त्यानुसार ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

बुकिंग सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनं एक पत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात 'सरकारनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्यानं रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करत आहोत. त्यासाठी प्रवासी आरक्षण सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचं बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता येईल', असं नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

बुधवारपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा