Advertisement

मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांची गर्दीपासून होणार सुटका


मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांची गर्दीपासून होणार सुटका
SHARES

पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर ऑक्टोबर 2017 पासून लोकल रेल्वेच्या 80 नवीन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद यांनी ही माहिती दिली.
दादर, वांद्रे, कुर्ला आणि इतर रेल्वे स्थानकांवर प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने त्याचा ताण रेल्वे वाहतुकीवर पडतो. मुंबईकरांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर वाढवण्यात येणाऱ्या नवीन फेऱ्यांचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच लागू होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील 10 फेऱ्या 15 डबे लोकलच्या असतील.

वाढवण्यात आलेल्या लोकलच्या नवीन फेऱ्या-
मध्य रेल्वेवर 40 फेऱ्यांमध्ये वाढ
पश्चिम रेल्वे मार्गावर 35 फेऱ्यांमध्ये वाढ
मध्य रेल्वेवरील 40 फेऱ्यांपैकी 12 मेनलाईनवर
ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फेऱ्या
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरारदरम्यान लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा