वंदे भारत एक्स्प्रेसला ट्रेन 18 म्हणूनही ओळखले जाते जी स्वदेशी डिझाइन केलेली ट्रेन आहे. ही एक अनोखी ट्रेन आहे जी भारतीय रेल्वेसाठी प्रवास तंत्रज्ञानातील एक नवीन युग दर्शवेल यात शंका नाही.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, ऑनबोर्ड वाय-फाय, पूर्णपणे स्वयंचलित दरवाजे इत्यादी अनेक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
Vande Bharat Express या सेमी हायस्पीड ट्रेनची किंमत 100 कोटी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा वेगवान आहे. या बातमीतद्वारे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनबद्दल काही मनोरंजक फॅक्ट्स जाणून घेऊया.
वंदे भारत एक्सप्रेसबद्दल फॅक्ट्स
ट्रेन 18 किंवा वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन आहे. आजपर्यंत, भारतातील ट्रेनमध्ये स्वतंत्र इंजिन कोच आहे. तर ट्रेन 18 मध्ये बुलेट किंवा मेट्रो ट्रेनसारखे इंटिग्रेटेड इंजिन आहे.
ट्रेनमध्ये इकनॉमी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास या दोन आसन पर्यायांसह 16 पूर्ण वातानुकूलित चेअर कार कोच आहेत. आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग चेअर असते जी 180 अंश फिरू शकते. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पुरवल्या गेलेल्या सर्वात महत्त्वाच्या सुविधांपैकी एक म्हणजे सरकत्या पायऱ्यांसह स्वयंचलित दरवाजे जे मेट्रो ट्रेनप्रमाणे केंद्रीकृत नियंत्रण आहेत.
सेमी-हाय स्पीड ट्रेनमध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. मुंबई - शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये व्हेज जेवणाला प्राधान्य दिले जाईल. तर मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये साऊजी चिकन अशा नॉनव्हेज जेवणाला प्राधान्य दिले जाते.
वंदे भारत एक्स्प्रेस वापरकर्त्यांना ऑनबोर्ड वाय-फाय सेवा मिळेल.
ट्रेनमध्ये GPS आधारित माहिती देणारी प्रणाली देखील आहे. ही प्रणाली तुम्हाला आगामी स्टेशन आणि इतर माहितीबद्दल अपडेट करेल.
स्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी बायो-व्हॅक्यूम टॉयलेटचा वापर भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या वॉशरूमसाठी केला जातो. विमानांमध्ये खास करून अशी सुविधा असते.
ट्रेनच्या सर्व 16 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ट्रेन पूर्ण थांबल्यावरच ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे उघडतील. जेव्हा दरवाजे पूर्णपणे बंद असतात तेव्हाच ट्रेन सुरू होते.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या काही डब्यांमध्ये व्हीलचेअर ठेवण्यासाठी मोकळी जागा असेल, जेणेकरून अपंगांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
एका डब्याची सरासरी किंमत सुमारे 6 कोटी रुपये असेल. तसेच, जेव्हा ट्रेनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाईल तेव्हा त्याची किंमत प्रति डबा 5 कोटी रुपयांच्या जवळ येईल, असे सांगितले जाते.
हेही वाचा