मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-pune-solapur vande bharat express) आणि मुंबई-नाशिक रोड-साईनगर शिर्डी (Mumbai-nashik-shirdi vande bharat express) या मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावरील सर्वात महागड्या गाड्या असतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पुणे प्रवासाचा अंदाजे वेळ 3 तास, साईनगर शिर्डी पर्यंत 6 तास आणि सोलापूर पर्यंत 5 तास 30 मिनिटे असेल. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.
10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. त्याच दृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच सांगितले होते की, रेल्वे पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस दर आठवड्याला सुमारे दोन किंवा तीन नवीन वंदे भारत गाड्या चालवण्यास सक्षम असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी घोषणा केली होती की पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील.
वंदे भारत एक्सप्रेस विमानाप्रमाणे प्रवासाचा अनुभव देते. ती जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि शताब्दी ट्रेन प्रमाणेच प्रवासाचे वर्ग पण चांगल्या सुविधांसह आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एकूण 1,128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. सेमी-हाय स्पीड ट्रेनचे सर्व डबे स्वयंचलित दरवाजे, GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली आणि ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फायने सुसज्ज आहेत.
हेही वाचा