मुंबई ते शिर्डी (Mumbai to Shirdi) आणि मुंबई ते सोलापूर (Mumbai to Solapur) या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे (vande Bharat express) उद्घाटन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांच्या हस्ते एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार आहे. (food in vande Bharat express)
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणाऱ्या न्याहारी, जेवण यांबाबतदेखील आयआरसीटीसीकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.
नाष्टा काय?
ज्वारी, राजगिरा आणि नाचणीपासून बनवलेले विशेष खाद्यपदार्थ यांमध्ये मनसोक्त खाता येणार आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत.
जेवणात काय?
जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय आहेत. यांसह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. (Vande Bharat Express Menu)
सायंकाळची न्याहारी
सायंकाळच्या न्याहारीमध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबिर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय आहेत.
सोलापूर एक्स्प्रेसमध्ये नॉनव्हेजची मेजवानी
सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मांसाहारी खवय्यांसाठी जेवणात सावजी चिकन, चिकन कोल्हापुरी, तांबडा रस्सा हे पदार्थ मिळतील. या खाद्यपदार्थांची प्रादेशिक चव कायम राहावी, यासाठी स्थानिक महिला बचत गटांनी बनवलेल्या पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी बचत गट अस्तित्वात नसतील, त्या ठिकाणी अन्य पर्यायांचा स्वीकार केला जाईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच न्याहारी आणि जेवणाचे खाद्यपदार्थ निवडावे लागणार आहेत. शिवाय यासाठीचे पैसे प्रवाशांना भरावे लागणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा