ओव्हरहेड वायरला चिकटून एक युवक गंभीर जखमी

 Chembur Railway Station
ओव्हरहेड वायरला चिकटून एक युवक गंभीर जखमी
Chembur Railway Station, Mumbai  -  

चेंबूर - लोकलच्या टपावरून प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे, अशा उद्घोषणा प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या कानी पडत असतात मात्र या नियमांचे उल्लंघन करून अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालताना दिसतात. परिणामी अनेकांना प्राणास मुकावे लागते. असाच काहीसा प्रकार चेंबूर स्थानकात मंगळवारी घडला.

हार्बर मार्गावरील पनवेलहून सीएसटीकडे निघालेल्या लोकल गाडीच्या टपाववरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरला चिकटून युसूफ गुलाम शहा (20) हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना चेंबूर स्थानकात मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. हा तरुण मानखुर्द येथील लालूभाई कंपाउंड इथल्या इमारतीतला रहिवासी आहे. त्याला तत्काळ दोन हमाल आणि लोहमार्ग पोलीस शिपाई बी. ए. सुरवसे यांच्या मदतीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी युसुफला उपचारासाठी वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल केले आहे. या घटनेत युसुफच्या डाव्या कानाला गंभीर जखम झाली असून संपूर्ण शरीर जळाले आहे.

Loading Comments