Advertisement

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलमध्ये महिला बोगींंना वेगळा रंग


जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलमध्ये महिला बोगींंना वेगळा रंग
SHARES

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने महिलांसाठी विशेष भेट दिली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या एसी लोकलमध्ये महिलांसाठी २ राखीव बोगी देत त्या बोगी वेगळ्या रंगात रंगवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे महिलांना एसी लोकलमध्ये चढण्यास आणखी सोयीस्कर होऊ शकेल.


महिलांच्या बोगीला हिरवा रंग

वातानुकूलित लोकलमध्ये सोमवारपासून २ बोगी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला. सामान्य लोकलप्रमाणे एसी लोकलमध्येही महिला प्रवाशांसाठी राखीव बोगी असावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी राखीव बोगी देत त्यांना महिला डब्बा ओळखता यावा, यासाठी राखीव बोगीला हिरवा रंग देण्यात आला आहे.

 

बोगीवर महिलेचं चित्र

एसी लोकलच्या महिला डब्ब्याला हिरवा रंग देत त्यावर एका साडी नेसलेल्या महिलेचं चित्र काढण्यात आलं आहे. ज्यामुळे त्यांना महिला डब्बा ओळखण्यात मदत होईल. आतापर्यंत मुंबईत सुरू झालेल्या पहिल्या एसी लोकलला निळा आणि चंदेरी रंग आहे. पण, महिलांचा डब्बा वेगळ्या रंगाने रंगवल्यामुळे महिला डब्बा ओळखणं सहज सोपं होणार आहे.

या दोन्ही कोचचा खर्च एकूण ५ लाख एवढा आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा