मुंबईकरांच्या सेवेत लवकरच रोरो

  मुंबई  -  

  मुंबई : मुंबईकरांनो आता तुमच्या स्वप्नातला प्रवास लवकरच सत्यात उतरणार आहे आणि तुमचें हे स्वप्न सत्यात उतरणार आहे मार्च 2018 पूर्वी. होय हे खरंय. बहुप्रतिक्षेत असलेला रो-रो प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वास येतोय.

  नेमकी काय आहे ही रोरो पँक्स सेवा पाहूया

  मुंबईला बारमाही जोडण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारचं सकारात्मक पाऊल

   रो-रो पॅक्स सेवेमुळे मुंबई येथे मालवाहतूक, पर्यटन या क्षेत्रांचाही विकास होणार

  रो-रो पॅक्स सेवेमुळे नेरूळ ते मांडवा आणि मांडवा ते भाऊचा धक्का अशा त्रिकोणात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार

  रो-रो पॅक्स सेवेमुळे नेरूळ ते मांडवा अंतर अवघ्या 17 मिनिटांत, तर भाऊचा धक्का ते मांडवा अंतर 15 मिनिटांत पार करता येणार

  प्रवाशांसोबतच बस, कार यांची देखील रोरो पॅक्स सेवेमधून वाहतूक करणार असल्यामुळे इंधन आणि वेळ वाचणार

  मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्का इथं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ऑईल जेट्टी, प्रवासी टर्मिनल आणि बंकरींग टर्मिनलच्या कामाचा भूमिपूजन तसंच कोनशिला अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास लवकरच आणखी सोईस्कर होणार हे मात्र नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.