होळीनिमित्त मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 100 जादा बसेस

 Mumbai
होळीनिमित्त मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 100 जादा बसेस

मुंबई - होळीच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खूशखबर आहे. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) तर्फे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरता 100 जादा बस गाड्या सोडल्या जाणार आहेत.

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, नेहरूनगर या बसस्थकातून सदर बसेस सुटणार आहेत. मुंबई सेंट्रल येथून दापोली, गुहागर, देवरुख, खेड, कासेपेडांबे, शेवते, बुरुंबेवाडी, मेढे आणि पिंपळोली या ठिकाणासाठी बसेस सुटतील. तर परळ येथून खेड-दापोली, आंजले, मासरंग, भातगाव या ठिकाणासाठी बसेस रवाना होणार आहेत. या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, खानदेश मराठवाडा या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपरोक्त बसस्थानकातून शनिवारी आणि रविवारी 50 जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.

Loading Comments